दिग्गज बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डनने एका सामन्यात घातलेल्या बुटांची तब्बल 6 लाख 15 हजार डॉलर्सला (जवळपास 4 कोटी 60 लाख रुपये) विक्री झाली आहे. क्रिस्टी ऑक्शनने याबाबतची माहिती दिली असून, काही महिन्यांपुर्वीच बुटांची विक्रमी किंमतीत विक्री झाली होती. आता या लिलावात तो विक्रम मोडला आहे.
या दिग्गज खेळाडूच्या बुटांची लिलावात झाली कोट्यावधी रुपयांना विक्री
ओरिजन एअर नावाने हा लिलाव करण्यात आला. हे स्निकर्स एअर जॉर्डन 1 चे असून, जे एनबीए स्टारने 1985 मध्ये एका सामन्यात घातले होते. हा सामना इटलीमध्ये खेळला गेला होता. या सामन्यात डॉर्डनने बॉल एवढ्या जोरा आपटला होता की, बॅकबोर्डची काच तुटली होती.

क्रिस्टी ऑक्शनचे हँडबँग आणि स्निकर्स सेल्सचे प्रमुख डोनोव्हन यांनी सांगितले की, हे बुट खरे असून, बुटांसोबतच बॅकबोर्डच्या काचेचा तुकडा देखील आहे. जॉर्डनने 13.5 साइजचे बुट घालून 30 अंक मिळवले होते. लाल आणि काळ्या रंगाचे हे बुट त्याच्या शिकागो बुल्सच्या टीमचेच आहेत.
याआधी मे महिन्यात हे बुट जवळपास 5 लाख 60 हजार डॉलर्समध्ये विकले गेले होते.