व्हॉट्सअॅप युजर्ससाठी ‘दुःखद बातमी’


एका शानदार फीचरवर लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअॅप काम करत होते, पण हे फीचर आता युजर्सना वापरायला मिळणार नसल्याची शक्यता असून याबाबतची माहिती व्हॉट्सअॅप चे फीचर्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo ने ट्विट करुन दिली आहे. ‘व्हॅकेशन मोड’ नावाचे एक नवीन फीचर व्हॉट्सअ‍ॅपकडून आणले जाणार होते. या फीचरवर कंपनी 2018 पासून काम करत होती. पण या फीचरची टेस्टिंग कंपनीने आता बंद केली आहे.

युझर्संना व्हॅकेशन मोड फीचरच्या साहाय्याने मेसेजेसना पूर्णपणे इग्नोर आणि चॅट्स लपवता येतात, अशी माहिती समोर आली होती. याद्वारे ‘Archive चॅट्स इग्नोर’ चा पर्याय युजर्सना मिळाला असता. म्हणजे युजर्स सुट्टीवर असताना सर्व चॅट्स आणि मेसेजकडे दुर्लक्ष करुन या अ‍ॅपपासून ब्रेक घेऊ शकणार होते. सध्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Archive चॅट सर्वात खाली जातात, पण त्यावर एखादा मेसेज आला की आपोआप Archive चॅट वरती येतात आणि मेसेज दिसू लागतात. त्यामुळे Archive चॅट्स लपवण्यासाठी आणि व्हॉट्सअ‍ॅपपासून दूर राहण्यासाठी व्हॅकेशन मोड फीचर फायदेशीर ठरले असते. पण या फीचरवर काम करणे कंपनीने आता बंद केल्यामुळे युजर्सना हे फीचर वापरायला मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.