… म्हणून दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आनंद महिंद्रा पाहतात हा व्हिडीओ

उद्या देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप, सोशल मीडियावर याच्या शुभेच्छा देणारे मेसेज, व्हिडीओ येण्यास सुरुवात झाली आहे. असाच एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्योगतपी आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आपल्या बोबड्या आवाजात राष्ट्रगीत गात आहे. तो गाताना अनेक वाक्य पुन्हा पुन्हा म्हणतो , अनेकदा विसरतो देखील, मात्र आपले बोलणे सुरूच ठेवतो.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मी पहिल्यांदा हा व्हिडीओ एक वर्षांपुर्वी किंवा त्याआधी पाहिला होता. मी व्हिडीओ सेव्ह केला होता व दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या आधी जोश वाढविण्यासाठी हा व्हिडीओ बघतो. हे मला उत्तेजन देते व त्याचा निरागसपणा मला भावतो.

हा लहान चिमुकला अगदी निरागसपणे राष्ट्रगीत गात आहे. गाताना तो अनेक शब्द देखील पुन्हा पुन्हा बोलतो, शेवटचे शब्द विसरतो देखील. मात्र ज्या प्रकारे तो हिंमतीने गात आहे, त्याने अनेकांचे मन जिंकून घेतले.

या व्हिडीओ आतापर्यंत 1.8 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिले असून, नेटकरी या मुलाचे भरभरून कौतुक करत आहेत.