कोरोना : जायडस कॅडिलाने भारतात लाँच केले रेमडेसिवरचे सर्वात स्वस्त व्हर्जन

औषध कंपनी जायडस कॅडिलाने कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी असलेले औषध रेमडेसिवरला रेमडेक ब्रँड नावाने भारतीय बाजारात सादर केले आहे. कंपनीने माहिती दिली रेमडेकच्या 100 मिलीग्रॅम कुपीची किंमत 2,800 रुपये आहे. ही भारतात उपलब्ध असलेल्या रेमडेसिवरच्या ब्रँडची सर्वात कमी किंमत आहे.

जायडस कॅडिला सांगितले की, हे औषध त्यांच्या वितरण साखळीद्वारे देशभरात उपलब्ध होईल. हे औषध सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये मिळेल. कॅडिला हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शरविल पटेल यांनी सांगितले की, रेमडेक सर्वात स्वस्त औषध असून, कोव्हिड-19 च्या उपचारात अधिकाधिक रुग्णांपर्यंत हे औषध पोहचावे असे आम्हाला वाटते.

या औषधासाठी सक्रिय औषध घटक (एपीआय) गुजरातच्या युनिटमध्ये तयार केले गेले आहे. जायडस कॅडिला कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याचा देखील प्रयत्न करत आहे. कंपनीने या लसीला जायकोव्ह-डी नाव दिले असून, या लसीचे दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे.