अमेरिकेने आपल्या नागरिकांना केले पाकिस्तानचा प्रवास न करण्याचे आवाहन

अमेरिकेने आपल्या नागरिकांना कोव्हिड-19 महामारी आणि आणि दहशतवादी हल्ल्याचा धोका यामुळे पाकिस्तानचा प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रवासाची नवीन नियमावली जारी करत म्हटले आहे की, कोव्हिड-19 मुळे पाकिस्तानसाठी लेव्हल 3 श्रेणीचे प्रवास आरोग्य नोटीस जारी करण्यात आली आहे.

या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कोव्हिड-19 मुळे पाकिस्तानचा प्रवास करणाऱ्या लोकांना सीमा बंद असणे, विमानतळ बंद असणे, प्रवासावरील प्रतिबंध, घरात राहण्याचे आदेश व अन्य आपत्ती स्थितीचा सामना करावा लागू शकतो.

अमेरिकन नागरिकांना बलूचिस्तान, खैबर पख्तूनख्वा प्रांतासह पुर्वेतील काही भागांमध्ये न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण येथे दहशतवाद आणि अपहरणाचा धोका आहे. याशिवाय नागरिकांना दहशतवाद आणि संभावित सशस्त्र संघर्ष यामुळे नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात जाणे टाळावे असे सांगण्यात आले आहे.