कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी थायलंडमधील वटवाघुळाच्या गुहेत पोहोचले संशोधक


वटवाघुळ पकडण्यासाठी थायलंडमध्ये संशोधक खेड्यापाड्यांमधून ट्रेकिंग करत असून त्यांना पकडण्याचा वटवाघुळांचा अधिवास असलेल्या गुहेमध्ये जाऊन प्रयत्न करत आहेत. थायलंडमधील संशोधकांचा ट्रेकिंगमागचा संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या कोरोना व्हायरस या आजाराच मूळ शोधून काढणे हा मूळ उद्देश आहे.

वटवाघुळचे कोरोनाचे वाहक असल्याचे आतापर्यंत झालेल्या प्राथमिक संशोधनातून समोर आले आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या डाटानुसार, जगभरात आतापर्यंत अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७ लाख ४८ हजार नागरिकांचा जगभरात या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हॉर्सशू वटवाघुळाच्या १९ प्रजाती थायलंडमध्ये आहेत. पण कोरोनासंबंधी अजून त्यांची चाचणी झालेली नाही असे संशोधकांनी सांगितल्याचे वृत्त असोसिएटड प्रेसने दिले आहे.

संशोधकांनी थायलंडच्या पश्चिम प्रांतातील कांचनबुरी येथील साई योक नॅशनल पार्कमधील तीन वेगवेगळया गुहेमधून येणारी वटवाघुळे पकडण्यासाठी जाळे लावले होते. वटवाघुळांची लाळ, रक्त आणि स्टूलचे थाई रेड क्रॉस इन्फेकशियस डिजीस हेल्थ सायन्स सेंटरच्या टीमने नमुने घेतल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. हॉर्सशू वटवाघुळांचेच नाही तर अन्य वटवाघुळांच्या प्रजातीचे सुद्धा नमुने गोळा केले गेले. कुठल्या रोगकारी जंतूचे वहन ही वटवाघुळे करतात, ते समजून घेण्यासाठी या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला.

या टीमचे नेतृत्व सेंटरचे उपप्रमुख सुपापॉर्न वाचाराप्लुसादी करत होत्या. ते मागच्या २० वर्षांपासून वटवाघुळे आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या आजारांचा अभ्यास करत आहेत. थायलंडमध्ये जानेवारी महिन्यात आढळलेल्या कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची ओळख पटवण्याच्या टीममध्ये त्यांचा देखील समावेश होता. कोरोनाला कारणीभूत ठरलेला व्हायरस थायलंडमधील वटवाघळांमध्ये सापडेल असा विश्वास त्यांना आहे.