नवनीत राणांना श्वास घेण्यास त्रास, पुढील उपचार मुंबईत घेणार

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर नागपूरच्या वोकार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र आता त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांच्या सांगण्यावरून मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार आहे.

हवामान खराब असल्याने त्यांना रुग्णवाहिकेने मुंबईला नेले जाणार आहे. त्यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार होणार आहेत. नवनीत राणा यांच्या फुफ्फुसात इंफेक्शन पसरल्याने एडवांस उपचारासाठी त्यांना मुंबईला उपचारासाठी नेले जात आहे. रुग्णवाहिकेत नवनीत राणा यांच्यासोबत त्यांचे पती रवि राणा असतील. त्यांच्यावर पुढील उपचार मुंबईमध्येच होईल.

नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील एकूण 16 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे.