स्वातंत्र्यदिनापूर्वी ईमानदार करदात्यांना मोदींनी दिली मोठी भेट


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनापूर्वी देशातील करदात्यांना मोठी भेट दिली असून आज Transparent Taxation – Honoring The Honest नव्या व्यवस्थेचे लोकार्पण करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसलेस स्टेटमेंट, फेसलेस अपील आणि टॅक्सपेयर्स चार्टरची ही योजना असल्याचे म्हटले आहे. आजपासून यापैकी फेसलेस स्टेटमेंट आणि टॅक्सपेयर्सची सुविधा सुरु होणार असून 25 सप्टेंबरपासून फेसलेस अपीलची सुविधा देशवासियांच्या सेवेत येणार असल्याचे मोदींनी सांगितले आहे.

Transparent Taxation – Honoring The Honest या प्लॅटफार्मचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. सरकारी प्रणालीमध्ये महत्वाचे बदल करण्यावर गेल्या सहा वर्षांत आमचे लक्ष्य़ राहिले असून तो नवा प्रवास आजपासून सुरु झाला आहे. देशाच्या बांधणीत देशाचा ईमानदार करदाता मोठी भूमिका निभावत असतो. त्याचे आयुष्य जेव्हा सोपे होते, तो तेव्हा प्रगती करतो, यामुळे देशही प्रगती करू लागतो. आजपासून सरकारचा हस्तक्षेप सुरु होणाऱ्या या सुविधेमध्ये कमी होणार असून अधिकाधिक कारभार चालविला जाणार असल्याचे मोदी म्हणाले.

याबाबत माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, ईमानदार करदात्यांना पुरस्कार देणे हे मोदींचे मिशन असल्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता येईल. त्याचबरोबर आयकर विभाग आणि करदात्यांमध्ये ताळमेळ असेल. गेल्या वर्षी कार्पोरेट कर 30 वरून 20 टक्के केला होता. आयकर विभागाने अनेक सुधारणा लागू केल्या आहेत. करदात्यांना सन्मान देणे ही पंतप्रधानांची इच्छा आहे.

त्याचबरोबर लोकांच्या गरजेनुसार नियम बनविले जात आहेत. देशाला याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. आता शॉर्टकट चुकीचा आहे, याचा भास साऱ्यांनाच होत आहे. चुकीचे मार्ग पकडणे योग्य नाही हे देखील ते जाणत आहेत. तो काळ आता मागे सरला आहे. आता कर्तव्य आणि देशसेवेची भावना जोर पकडत आहे. हा बदल सक्ती किंवा शिक्षा देऊन आलेला नाही. जेव्हा सरकारची निती स्पष्ट असते, तेव्हा काळे करण्याची वृत्ती कमी होऊ लागते आणि सामान्यांचा विश्वास वाढू लागतो. सरकारी कामामध्ये मानवी हस्तक्षेप कमी करून तंत्रज्ञानाचा वापर आणि सरकारी यंत्रणेतील चांगले काम करणाऱ्यांना पुरस्कार देणे ही यामागची कारणे असल्याचे मोदी म्हणाले.