Microsoft Surface Duo च्या किंमतीचा झाला खुलासा, या दिवशी होणार लाँच

मायक्रोसॉफ्टच्या बहुप्रतिक्षित सर्फेस ड्युओ या कंपनीच्या ड्युअल स्क्रिन फोनची जगभरात चर्चा सुरू आहे. हा फोल्डेबल नसून, ड्युअल स्क्रीन फोन आहे. हा फोन कधी लाँच होणार याची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती, मात्र आता कंपनीने लाँचिंगच्या तारखेची माहिती दिली आहे.

मायक्रोसॉफ्ट सर्फेस ड्युओ स्मार्टफोन 10 सप्टेंबरला लाँच होणार आहे. या फोनला मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये सादर करण्यात आले होते. मायक्रोसॉफ्टच्या या ड्युअल स्क्रीन फोनची सुरुवातीची किंमत 1399 डॉलर्स (जवळपास 1.04 लाख रुपये) असेल. फोनच्या किंमतीची माहिती मायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे. मात्र फोनच्या ग्लोबल लाँचिंगबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Image Credited – Microsoft

फोनच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर कंपनीने फीचर्सचा अधिकृतरित्या खुलासा केलेला नाही. पंरतू लीक झालेल्या रिपोर्टनुसार, सर्फेस ड्युओमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर असेल. याशिवाय फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी/256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळू शकते. या फोनमध्ये 11 मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा असेल. म्हणजे रिअर आणि फ्रंटसाठी एकच कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

Image Credited – TechGenyz

रिपोर्टनुसार, या फोनमध्ये 5.6 इंच एमोलेड डिस्प्ले मिळेल, ज्याचे रिझॉल्यूशन1800×1350 पिक्सल असेल. डिस्प्लेची पिक्सल डेंसिटी 401पीपीआई असेल. फोनच्या डिस्प्लेला कोणत्याही अँगलन फिरवता येईल. फोनमध्ये अँड्रॉईड 10 मिळेल. सोबतच 3460mAh बॅटरी आणि 4जी एलटीई सपोर्ट सोबत हा फोन लाँच केला जावू शकतो.