राजस्थान सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत भाजप

राजस्थानमध्ये गेहलोत सरकारविरोधात बंड करणारे काँग्रेस नेते सचिन पायलट यांचे बंड अखेर शमले आहे. आता राजस्थानमध्ये 14 ऑगस्टपासून विधानसभा सत्र सुरू होणार आहे. या विधानसभा सत्रात भाजप गेहलोत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. राजस्थानचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. अविश्वास प्रस्ताव आणून भाजप गेहलोत सरकारच्या अडचणी वाढवत आहे.

कटायिराय यांनी माहिती दिली की, आम्ही आमच्या सहकारी पक्षांसह विधानसभेत अविश्वास प्रस्ताव मांडणार आहोत. आम्ही आमच्या रणनितीवर विचार करत आहोत. राजस्थान सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करू शकणार नाही.

दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या विधानसभा सत्राआधी गेहलोत यांच्या घरी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक आज होत आहे. यात बैठकील सचिन पायलट यांच्यासह बंड करणारे आमदार देखील सहभागी होत आहेत. केसी वेणुगोपाल देखील या बैठकीला उपस्थित असतील.

दुसरीकडे, विधानसभा सत्राआधी वसुंधरा राजे व भाजपच्या अन्य नेत्यांनी देखील आज बैठक केली. या बैठकीत विधानसभा सत्रासाठी रणनिती तयार करण्यात आली.