तुमच्या खात्यात सरकारने टाकलेले पैसे आले की नाहीत ? या नंबरवर कॉल करून घ्या माहिती

केंद्र सरकार शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकत आहे. जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि तुमच्या खात्यात पैसे आले नसल्यास, काळजी करू नये. तुमच्या खात्यात हे पैसे आले की नाही याची माहिती तुम्ही घरी बसून घेऊ शकता. ही माहिती केवळ एका मिसकॉलवर तुम्हाला मिळेल. केवळ शेतकरीच नाही तर ज्या लोकांनी जनधन खाते उघडले आहे, ते देखील कॉल करून पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळवू शकतात.

बँक ऑफ इंडिया –

बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेले ग्राहक रक्कमेबद्दल जाणून घेण्यासाठी 09015135135 वर मिस कॉल देऊ शकतात. मिस कॉल दिल्यानंतर काही वेळातच बँलेंस जमा झाले की नाही, त्याचा मेसेज येईल.

स्टेट बँक ऑफ इंडिया –

स्टेट बँक ऑफ इंडियाचे जनधन खातेधारक  18004253800 किंवा 1800112211 वर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरने मिसकॉल देऊन पैसे जमा झाल्याची माहिती जाणून घेऊ शकतात. ग्राहकांना खात्यातील मागील 5 व्यवहारांची माहिती मिळेल. याशिवाय रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 9223766666 वर देखील कॉल करू शकता.

पंजाब नॅशनल बँक –

पंजाब नॅशनल बँकेचे खातेधारक आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 18001802223 किंवा 01202303090 वर मिस कॉल देऊ शकतात. याशिवाय BAL (space) 16 आकडी खातेक्रमांक लिहून 5607040 या नंबरवर मेसेज केल्यानंतरही खात्यातील रक्कमेची माहिती प्राप्त होईल.

ओबीसी बँक –

ओबीसी खातेधारक रजिस्टर्ड मोबाई नंबरवरून 8067205767 पकिंवा टोल फ्री नंबर 1800-180-1235 वर मिस कॉल देऊन माहिती मिळवू शकतात.

इंडियन बँक –

या बँकेचे ग्राहक 80042500000 किंवा 9289592895 या नंबरवर कॉल करून माहिती मिळवू शकतात.