परदेशातून मुंबईला येणाऱ्या नागरिकांना आता क्वारंटाईन नियमात मिळणार सूट

नागरी उड्डाण मंत्रालयाने मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या नागरिकांना आता क्वारंटाईन नियमांमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. आता या प्रवाशांना अनिवार्य असलेले इंस्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार नाही. सध्याच्या काळात इमर्जेंसी कारणामुळे लोक प्रवास करत असल्याने आता ही सूट देण्यात आलेली आहे. आता ज्यांनी 96 तासांच्या आत कोरोना चाचणी केलेली आहे, अशा प्रवाशांना आता या नियमात सूट देण्यात आली आहे.

आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना 72 तासांच्या आत कोव्हिड-19 ची चाचणी दाखवावी लागेल. महाराष्ट्र सरकारच्या नियमांनुसार परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना दोन टप्प्यात क्वारंटाईन रहावे लागते. यात 7 दिवसांचा इंस्टिट्यूशनल क्वारंटाईन आणि 7 दिवसांच्या होम क्वारंटाईनचा समावेश आहे. आता नवीन नियमांनुसार कोणताही प्रवासी कोरोना चाचणी दाखवून इंस्टिट्यूशनल क्वारंटाईनपासून वाचू शकतो.

याशिवाय मुंबई महानगरपालिकेने देशांतर्गत विमान प्रवास करून मुंबईला येणाऱ्या सर्व प्रवाशांना 14 दिवसांचे होम आयसोलेशन अनिवार्य केले आहे.