देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी कोमात; आर्मी रुग्णालयाची माहिती


नवी दिल्ली – देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी कोमात गेले असून अद्याप त्यांच्या प्रकृतीत कोणतीही काहीही सुधारणा झालेली नसल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आल्याची माहिती आर्मी रुग्णालयाने दिली आहे.

दरम्यान त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती ट्विट करुन एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. प्रणब मुखर्जी यांची प्रकृती १० ऑगस्टपासून बिघडली आहे. १० तारखेच्या एक दिवस आधीच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण त्यांच्या प्रकृतीत तेव्हापासून काहीही सुधारणा झालेली नाही. आता ते कोमात गेल्याचे आर्मी रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.