H-1B व्हिसाधारकांना ट्रम्प प्रशासनाकडून मोठा दिलासा


वॉशिंग्टन – H-1B व्हिसाधारकांना अमेरिकेतील सत्ताधारी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने दिलासा दित H-1B व्हिसावरील निर्बंधात थोडी शिथिलता आणली आहे. तत्पूर्वी H-1B व्हिसाधारकांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने लागू केला होता. जे नागरिक लॉकडाउन आधी काम करत होते, H-1B व्हिसाधारकांना त्याच नोकरीसाठी अमेरिकेत परत यायचे असेल तर, त्यांना परवानगी देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर व्हिसावरील निर्बंध शिथिल करताना H-1B व्हिसाधारकाच्या पत्नीलाही अमेरिकेत परतण्याची परवानगी दिली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या निर्बंध शिथिल करण्याचा सर्वाधिक फायदा भारतीयांना होईल. भारतीय H-1B हाच व्हिसा घेऊन अमेरिकेत जातात तसेच भारतीय मोठया संख्येन याच व्हिसावर तिथे नोकरी करतात.

परदेशी नागरिकांना अमेरिकेत रोजगाराची संधी देणाऱ्या H-1B सह वेगवेगळया व्हिसांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी बंदी आणली होती. ट्रम्प यांचा या व्हिसामुळे अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या संकटात येतात असा दावा आहे. अमेरिकेत कोरोनामुळे लॉकडाउन होता. त्यामुळे तिथे मोठया प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. अशा काळात स्थानिक लोकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी वेगवेगळया व्हिसावर ट्रम्प यांनी बंदी आणली होती. पण आता H-1B व्हिसाधारकांना त्यांनी दिलासा दिला आहे.