विराट कोहलीच्या आयपीएल संघात ‘आदित्य ठाकरे’ची निवड


मुंबई: देशाता कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता आयपीएलचा १३ वा हंगाम यंदा भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला असून त्यानुसार स्पर्धेची तयारीही जोरात सुरू झाली आहे. दरम्यान, बीसीसीआयने कोरोनाच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी एक टीमच्या स्क्वॉडमध्ये २४ खेळाडूंना सामील करण्याचे आदेश दिले आहेत. पण यूएईच्या पिचर खेळाडूंना सराव करण्यास मदत म्हणून तसेच फ्रेंचायझी नेट गोलंदाजांना आपल्यासोबत नेण्यास तयार आहेत.

सध्या गोलंदाजांच्या रोस्टरवर संघ काम करत आहेत. यात खासकरून फर्स्ट क्लास अंडर १९ आणि अंडर २३ राज्य स्तरावरील क्रिकेटर्सचा समावेश आहे. येथे युवा क्रिकेटर्सना आपला खेळ दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळणार आहे. आदित्य ठाकरे देखील या खेळाडूंपैकी एक असून ज्याच्या बॉलचा सामना आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे खेळाडू करणार आहेत. फ्रेचायजीसोबत त्याला सहभागी करून घेण्याचा निर्णय आरसीबीचे क्रिकेट संचालन डायरेक्टर माईक हेसनन यांनी घेतला आहे. विदर्भचा हा क्रिकेटर आयपीएल २०२० च्या आधी नेट्समध्ये आपली क्षमता दाखवण्यासाठी यूएईची यात्रा करेल. २१ वर्षीय ठाकरेकडे आता यूएईमध्ये विराट कोहलीसमोर आपली ताकद दाखवण्याची संधी आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला सीएच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण जगात कोरोनाचे संकट असल्यामुळे येथे कोरोनाच्या चाचणीसाठी बीसीसीआयकडून एसओपी देण्यात आले आहे. आदित्य ठाकरेला आरसीबीकडून पाहिल्यावर चांगले वाटत आहे. जर सहयोगी स्टाफ आणि कर्णधार विराट कोहलीला त्याने नेटमध्ये प्रभावित केले तर कोण जाणे त्याला कुठे संधी मिळेल? रणजीमध्ये ठाकरेने विदर्भाकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सात विकेट घेतल्या होत्या.