व्हिडीओ : वेटलिफ्टर उचलत होता 400 किलो वजन, अचानक तोल गेला आणि…

चेतावणी : व्हिडीओमधील दृष्य तुम्हाला विचलित करू शकतात.

अनेकदा आपण जिममध्ये आपल्या क्षमतेपेक्षा अधिक उचलण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. केवळ जिमच नाहीतर इतर ठिकाणीही आपल्या ताकदीपेक्षा अधिक काहीतरी करणे अनेकदा महागात पडू शकते. असेच काहीसे रशियन वेटलिफ्टर अ‍ॅलेक्झँडर सेडीखसोबत घडले आहे. अ‍ॅलेक्झँडरने 400 किलो वजनासह स्क्वॉड करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तो अयशस्वी ठरला. याच परिणाम असा झाला की, त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत.

अ‍ॅलेक्झँडर रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित द वर्ल्ड रॉ पॉवर लिफ्टिंग फेडरेशन यूरोपियन चॅम्पियनमध्ये भाग घेण्यासाठी पोहचला होता. जेथे तो स्पर्धे दरम्यान 400 किलो वजनासह स्क्वॉड करत होतो. मात्र स्क्वॉड करताना अचानक त्याचा तोल जातो व तो खाली पडतो. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की कशाप्रकारे वजन उचलणे शक्य न झाल्याने अ‍ॅलेक्झँडर अचानक वजनाखाली दबला जातो. यावेळी आजुबाजूचे लोक ते वजन पकडतात.

या घटनेनंतर अ‍ॅलेक्झँडरला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे त्याच्यावर 6 तास सर्जरी करण्यात आली. तो पुन्हा कधी स्पर्धेत उतरू शकेल, याबाबत काहीही सांगणे शक्य नाही.