ट्विटरवर ट्रोलिंगला बसणार आळा, आले नवीन फीचर

मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने एक नवीन फीचर जारी केले आहे. ट्विटरवर ट्रोल होणाऱ्यांसाठी हे फीचर फायदेशीर आहे. आतापर्यंत ट्विटरवर पब्लिक ट्विटवर कोणालाही रिप्लाय करणे शक्य होते. मात्र या फीचरमुळे ट्विटरवरील रिप्लायची पद्धतच बदलून जाणार आहे. या फीचरचे टेस्टिंग कंपनी मे महिन्यापासून करत होते.

कंपनीने आता आपल्या प्लॅटफॉर्मवर रिप्लाय लिमिटचे फीचर जारी केले आहे. भारतासह सर्वच युजर्ससाठी आता हे फीचर रोल आउट करण्यात आले आहे. कंपनीने म्हटले आहे की नवीन फीचर चर्चे दरम्यान लोकांनी अधिक कंट्रोल देईल.

ट्विटरवर आता ट्विट करताना खाली Who can reply लिहिलेले दिसेल. यावर टॅप करताच, तुम्हाला खाली काही पर्याय दिसतील. यात Everyone, People you follow आणि Only People You mention हे पर्याय आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यातील पर्याय निवडू शकता. तुम्ही जो पर्याय निवडाल, तेच लोक त्या ट्विटवर रिप्लाय करू शकतील.