‘मोदी है तो मुमकिन है’, घसरणाऱ्या जीडीपीवरून राहुल गांधींनी साधला निशाणा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सरकारच्या आर्थिक धोरणांवरून वारंवार टीका करताना दिसत आहेत. आता राहुल गांधींनी पुन्हा एकदा घसरणाऱ्या विकासदरावरून सरकारवर निशाणा साधत ‘मोदी है तो मुमकिन है’, असे म्हणत टोला लगावला आहे.

इंफोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या एका विधानाचा संदर्भ देत त्यांना भाजपचाच नारा असलेल्या मोदी है तो मुमकिन है,चा वापर करून सरकारवर निशाणा साधला आहे. नारायण मुर्तींनी म्हटले होते की, कोरोना व्हायरसमुळे चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी स्वातंत्र्यानंतर सर्वात कमी असेल. नारायण मुर्तींच्या याच विधानाचा संदर्भ देत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

नारायण मुर्ती म्हणाले होते की, 1947 नंतर पहिल्यांदाच देशाचा आर्थिक विकासाचा दर सर्वात कमी असण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेला पुर्वपदावर आणण्यासाठी पावले उचलायला हवीत.