या 6 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. त्याला थर्ड स्टेजमधील कॅन्सर आहे. संजय दत्त उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची देखील शक्यता आहे. फुफ्फुसाचा कॅन्सर हा खतरनाक आजार आहे. या आजारामुळे दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. या भयंकर आजाराची लक्षणे, कारण आणि त्याला कसे रोखता येईल, याविषयी जाणून घेऊया.

धुम्रपान केल्याने फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. मात्र ज्यांनी आयुष्यात कधीच ध्रुम्रपान केलेले नाही, त्यांना देखील हा आजार होऊ शकतो. फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका या गोष्टीवर अवलंबून असतो की, तुम्ही कधीपासून धुम्रपान करत आहात. या आजाराची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात येत नाहीत. आजार अ‍ॅड्वास स्टेजवर पोहचल्यावर याची माहिती मिळते. वारंवार खोकला येणे, खोकल्यातून रक्त पडणे, श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना, घसा बसणे, छातीत कफ होणे, वजन कमी होणे, हाडे दुखणे आणि डोके दुखी ही याची काही प्रमुख लक्षणे आहेत.

Image Credited – Aajtak

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा ?

काही त्रास जाणवू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुम्ही धुम्रपान करत असाल व तुम्हाला ते सोडणे शक्य नसल्यास तरीही तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे व्यसन सोडण्यास डॉक्टर मदत करू शकतात.

फुफ्फुसाच्या कॅन्सरचे कारण –

धुम्रपान हेच प्रामुख्याने या आजाराचे कारण आहे. धुम्रपान करणारे किंवा या धुराच्या संपर्कात येणाऱ्यांना हा आजार होऊ शकतो. कधीही धुम्रपान न करणाऱ्यांना देखील आजार होता. या प्रकारात कॅन्सरचे कारण शोधता येत नाही.

Image Credited – Aajtak

धुम्रपानामुळे का होतो कॅन्सर ?

डॉक्टरांनुसार, धुम्रपान फुफ्फुसांच्या पेशींना नुकसान पोहचवून कॅन्सरचा धोका निर्माण करते. जेव्हा तुम्ही सिगरेट पिता त्यावेळी कार्सिनोजेंस नावाचा पदार्थ लंग्स टिश्यूला वेगाने बदलण्यास सुरू करतो. सुरुवातीला तुमचे शरीर या डॅमेजला रिपेअर करते. मात्र वारंवार धुराच्या संपर्कात आल्याने फुफ्फुसांच्या पेशींना नुकसान पोहचते.

फुफ्फुसाच्या कॅन्सरचे किती प्रकार आहेत?

फुफ्फुसाच्या कॅन्सरला दोन भागात विभागण्यात आले आहे. ‘स्मॉल सेल लंग कॅन्सर’ आणि ‘नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर’. याच्या आधारावर डॉक्टर ठरवतात की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या उपचाराची गरज आहे.

Image Credited – Aajtak

फुफ्फुसाच्या कॅन्सरचे 6 प्रमुख कारण –

स्मोकिंग आणि नॉन स्मोकिंग या व्यतिरिक्त या आजाराचे आणखीही काही कारणे आहेत. जर तुम्ही अन्य प्रकारच्या कॅन्सरसाठी रेडिएशन थेरेपी केली असल्यास, या आजाराचा धोका उदभवतो. रेडॉन गॅसच्या संपर्कात आल्याने देखील हा आजार होता. याशिवाय अर्सेनिक, क्रोमियम आणि निकेल सारख्या एलिमेंटच्या संपर्कात आल्याने देखील हा आजार होतो. त्यामुळे तुम्ही कोठे राहता, काम करता हे देखील खूप महत्त्वाचे ठरते.

आजार होण्यापासून स्वतःचा कसा बचाव कराल ?

धुम्रपान करू नका, धुम्रपान करणाऱ्याच्या संपर्कात येणे टाळा. हार्ड रेडॉन भागांपासून लांब रहा. कामाच्या ठिकाणी कार्सिनोजेंस सारख्या विषारी केमिकलपासून लांब रहा. आहारात फळ आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. नियमित व्यायाम करून, तुम्ही हा आजार टाळू शकता.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही