रद्द करण्यात आलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमावरुन केदार शिंदेंचा राजकारण्यांना सवाल


दरवर्षी आपण दहीहंडीचा सण हा उत्साहात आणि आनंदात साजरा करतो, त्याचबरोबर दहीहंडी फोडण्याची अनेक गोविंदांची लगबग सुरु असते. पण यंदा कोरोनाचे संकट देशासह राज्यावर ओढावल्यामुळे दहीहंडीचे आयोजित कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या पार्श्वभूमीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी दरवर्षी कोटी रुपयांची पारितोषिक जाहीर करणारे राजकारणी यंदा ती रक्कम गोविंदांमध्ये वाटणार का, असा सवाल राजकारण्यांना विचारला आहे.

मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी दहीहंडी म्हटले की जल्लोषाचे वातावरण असते. मोठमोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात येते. यात कोटयावधी रुपयांची बक्षीसे अनेक मोठ्या ब्रॅण्ड्स किंवा राजकीय व्यक्ती जाहीर करत असतात. पण दरवर्षी या निमित्ताने कोटयावधींची बक्षीसे जाहीर करणारे राजकारणी व्यक्ती ही रक्कम गोविंदा मंडळात का वाटत नाही, असा थेट सवाल विचारला आहे.

यावर्षी दहीहंडी नाही. कुठलेच सण मोठ्या प्रमाणात साजरे करता येत नाहीएत. पण कोटी कोटीची पारीतोषिकं दरवर्षी जाहीर करणारे…

Posted by Kedar Shinde on Tuesday, August 11, 2020

यावर्षी दहीहंडी नाही. कुठलेच सण मोठ्या प्रमाणात साजरे करता येत नाहीत. पण कोटी कोटीची पारितोषिके दरवर्षी जाहीर करणारे राजकारणी brands, या वर्षी ती रक्कम गोविंदा मंडळात का वाटत नाहीत? या वर्षी त्यांनी या “थराला” जाऊन काम करावेच! #गोपाळकाला #दहीहंडी, अशी पोस्ट केदार शिंदे यांनी शेअर केली आहे.