आता भूकंप येण्याच्या आधीच गुगल करणार तुम्हाला अलर्ट

भूकंप आल्यानंतर सर्वसाधारणपणे लोक न्यूज चॅनेल किंवा वेबसाईट्सवर याबाबत माहिती घेतात. मात्र आता अँड्राईड यूजर्ससाठी गुगल एक नवीन फीचर आणणार आहेत. गुगलद्वारे अँड्राईड स्मार्टफोन यूजर्ससाठी फोनमध्ये अर्थक्वेक वॉर्निंग टूल्स देण्यात येणार आहे. हे टूल सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन सीरिजमध्ये मिळेल.

गुगलने याबाबत माहिती दिली की, अँड्राईड डिव्हाईसेजमध्ये अर्थक्वेक अलर्ट्स पाठविण्यासाठी अमेरिकेच्या जियोलॉजिकल सर्वेसोबत मिळून काम सुरू केले आहे. गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले की, जगभरात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत आहे. त्यामुळे आम्ही अँड्राईड डिव्हाईसची मदत घेण्याचा विचार केला. भूकंपासारख्या स्थितीमध्ये काही सेंकद आधी अलर्ट करून लोकांना सुरक्षित राहण्यास मदत करता येईल.

कंपनीने म्हटले की, भूकंप येण्याच्या स्थिती त्याला डिटेक्ट करण्यासाठी आणि अलर्टिंग सिस्टमला अ‍ॅडवांस सिग्नल्स पाठवण्यासाठी अँड्राईड फोन्सला मिनी सिस्मोमीटरमध्ये बदलता येईल. बहुतांश स्मार्टफोन हे लहान एक्सीलेरोमीटरसोबत येतात, जे भूकंप येणार असल्याची सांगू शकतात. हे पी-वेव डिटेक्ट करण्यास देखील सक्षम आहे. जे भूकंप येण्याआधीच्या सुरुवातीच्या लहरी असतात. हे नंतर येणाऱ्या एस-वेवच्या तुलनेत कमी नुकसानकारक असतात.

फोनला भूकंप येणाऱ्या असल्याचे जाणवल्यावर त्वरित गुगलच्या अर्थक्वेक डिटेक्शन सर्व्हरला सिग्नल पाठवेल. सोबतच जेथे भूकंपाचे लक्षण दिसत आहे, तेथील लोकेशन पाठवेल. यानंतर सर्व्हर इतर फोनमधून मिळालेली माहिती एकत्र करून, खरच भूकंप येत आहे की हे समजण्याचा प्रयत्न करेल. भूकंप येत आहे असे तुम्हालाल जाणवल्यास तुम्ही गुगलवर earthquake किंवा earthquake near me सर्च करून माहिती घेऊ शकता.