फेसबुक बंद करणार आपले हे लोकप्रिय अ‍ॅप!

फेसबुकने कमी इंटरनेट स्पीडमध्ये वापरता येणारे आणि कमी स्टोरेज खाणारे काही अ‍ॅप्स युजर्ससाठी लाँच केले होते. लाईट अ‍ॅप्सला लो स्पेसिफिकेशन असणाऱ्या स्मार्टफोनसाठी देखील आणण्यात आले होते. यात फेसबुक लाईट या अ‍ॅपचा देखील समावेश आहे. आता कंपनी हे अ‍ॅप बंद करणार आहे. याबाबत आज तकने वृत्त दिले आहे.

एका रिपोर्टनुसार, कंपनी आता या अ‍ॅपला डिएक्टिवेट करत आहे. हे अ‍ॅप मुख्य फेसबुक अ‍ॅपचे लाईट व्हर्जन होते, ज्यात फेसबुकचे सर्व बेसिक फीचर्स होते. मात्र कंपनीच्या या अ‍ॅपला एवढी लोकप्रियता मिळाली नाही. ब्राझीलमधील युजर्सला मोबाईलमध्ये अ‍ॅप असल्यास एक नॉटिफिकेशन पाठवले जात आहे. या नॉटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की आयओएससाठी फेसबुक लाईट अ‍ॅप डिसेबल करण्यात येत आहे. तुम्हा ओरिजन फेसबुक अ‍ॅपचा वापर करून आपल्या कुटुंबाशी आणि मित्रांशी संपर्कात राहू शकता.

अ‍ॅपल स्टोरवर देखील फेसबुक लाईट अ‍ॅप दिसत नाही आहे. परंतू अँड्राईड स्मार्टफोनमध्ये गूगल प्ले स्टोरवर हे अ‍ॅप उपलब्ध आहे. MacRumours च्या रिपोर्टनुसार, फेसबुकच्या एका प्रवक्त्याने सांगितले की लिमिटेड एडोप्शन आणि इंप्रूव्हमेंटमुळे आयओएसमध्ये हे अ‍ॅप सपोर्ट करणार नाही. दरम्यान, फेसबुकने भारतात हे अ‍ॅप बंद करण्यात येत असल्याची अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. त्यामुळे कंपनी भारतात हे अ‍ॅप बंद करणार आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.