सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये आयपीएलचा 13वा हंगाम सुरू होणार आहे. 20 ऑगस्टनंतर सर्व संघ यूएईला रवाना होणार आहेत. मात्र त्याआधीच राजस्थान रॉयल्सला मोठा झटका लागला असून, राजस्थान रॉयल्सचे फिल्डिंग कोच दिशांत याग्निक यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ते सध्या आपल्या घरी उदयपूर येथे असून, त्यांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनसाठी हॉस्पिटलमध्ये भरती होण्यास सांगण्यात आले आहे. दिशांत यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
आयपीएलच्या आधी राजस्थान रॉयल्सला झटका, फिल्डिंग कोच कोरोना पॉझिटिव्ह
14 दिवसानंतर दिशांत यांना बीसीसीआयच्या नियमांनुसार 2 चाचण्या कराव्या लागतील. दोन्ही चाचण्या नेगेटिव्ह आल्यानंतर 6 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल, त्यानंतरच त्यांना संघात सहभागी होण्याची परवानगी मिळेल. यूएईला पोहचल्यावर देखील त्यांच्या 3 चाचण्या नेगेटिव्ह येणे गरजेचे आहे.
मागील 10 दिवसांमध्ये दिशांत यांच्या संपर्कात आलेल्यांना फ्रेंचाइजीने कोव्हिड चाचणी करण्यास सांगितले आहे. सोबतच मागील 10 दिवसांमध्ये कोणताही खेळाडू त्यांच्या संपर्कात आला नव्हता, असे स्पष्ट केले आहे.