काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव त्यागी यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते राजीव त्यांचे आज सांयकाळी निधन झाले आहे. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना गंभीर स्थितीमध्ये गाझियाबादच्या यशोदा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. अचानक बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

राजीव त्यागी हे हिंदी टिव्ही चॅनेलवर पक्षाच्या बाजूने भक्कमपणे आपली मांडत असे. टिव्हीवरील ते काँग्रेसच्या प्रचलित चेहऱ्यांपैकी एक होते. सायंकाळी ते एका टिव्हीवरील कार्यक्रमात देखील सहभागी झाले होते. स्वतः त्यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली होती.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील याबाबत माहिती देत शोक व्यक्त करण्यात आला. काँग्रेसने लिहिले की, राजीव त्यागी यांच्या अचानक निधनामुळे आम्ही दुखी आहोत. ते एक पक्के काँग्रेसी आणि खरे देशभक्त होते. या कठीण काळात आमच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत.

राजीव त्यागी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर काँग्रेस, भाजपसह अनेक पक्षातील नेत्यांनी दुःख व्यक्त केले.