केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण

अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नाईक यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, कोव्हिड-19 ची चाचणी केली होती व त्यात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. मात्र कोणतेही लक्षण नाही.

नाईक यांनी मागील काही दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नाईक मोदी सरकारमधील कोरोनाची लागण झालेले पाचवे मंत्री आहेत. नाईक हे सध्या आयसोलेशनमध्ये आहेत.

श्रीपाद नाईक यांच्या आधी केंद्रीय मंत्री अमित शाह, धर्मेंद्र प्रधान, अर्जुन राम मेघवाल आणि कैलाश चौधरी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.