राम मंदिरासाठी दान करायचे आहे ? ट्रस्टने जारी केली बँक खात्याची माहिती

अयोध्येत प्रभू रामाच्या भव्य मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. श्री रामजन्मभूमि ट्रस्टने याबाबत माहिती देण्यात आली आहे. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. आता राम मंदिराच्या निर्मितीचे काम सुरू झाले आहे. आता ट्रस्ट या भव्य मंदिरासाठी देशभरातील लोकांकडे फंड मागत आहे.

ट्रस्टने देशभरातील लोकांना मंदिर निर्मितीसाठी दान करता यावे म्हणून अकाउंट नंबर व इतर माहिती देखील जारी केली आहे. ट्रस्टचे महासचिव चंपत राय हे व्हिडीओ शेअर करत म्हणाले की, कोट्यावधी राम भक्तांना मंदिराच्या उभारणीसाठी योगदान द्यायचे आहे. आता ट्रस्टने दान करण्याची सर्व माहिती दिली आहे.

ट्रस्टने ट्विट करत माहिती दिली की, भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले असून, मंदिराच्या निर्मितासाठी राम भक्तांनी दान करावे. ट्रस्टने ट्विट करत दान करण्यासाठी बँक अकाउंट्सची माहिती देखील शेअर केली आहे.