9 लाखांची ‘ही’ शानदार बाईक भारतात लाँच

ट्रायम्फ मोटारसायकलने भारतीय बाजारात स्ट्रिट ट्रिपल बाईकचे एक नवीन व्हेरिएंट ट्रायम्फ स्ट्रिट ट्रिप्ल आर लाँच केले आहे. या नवीन नेकेड मिडलवेट बाईकची किंमत 8.84 लाख रुपये आहे. नवीन बाईकची किंमत कंपनीच्या ट्रायम्फ स्ट्रिट ट्रिपल आरएस पेक्षा कमी असून, या बाईकची किंमत 11.33 लाख रुपये आहे.

स्ट्रिट ट्रिपल आर बाईकला कंपनीच्या डिलरशिपकडे 1 लाख रुपयात बुक करता येईल. ही नवीन बाईक कंपनीच्या स्ट्रिट ट्रिपल एस बाईकला रिप्लेस करेल, जी भारतीय बाजारात आधीपासूनच उपलब्ध आहे. ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल आरमध्ये 765सीसी, इन लाइन, 3 सिलेंडर इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 12,000 आरपीएमवर 116 बीएचपी पॉवर आणि 9,350 आरपीएम वर 79 एनएम टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये राइड-बाय-वायर आणि तीन राइडिंग मोड (रोड, रेन आणि स्पोर्ट) देण्यात आले आहे.

Source – navbharattimes

स्ट्रिट ट्रिपल आरमध्ये काही बदल देखील करण्यात आलेले आहेत, जेणेकरून पाहताना बाईकचा लूक अग्रेसिव्ह वाटेल. नवीन बाईकमध्ये ट्विन-एलईडी हेडलाईट्स, नवीन बॉडीवर्क आणि एक फ्लाय स्क्रीन आहे. यात नवीन टेल सेक्शनसोबत एक रिडिजाईंड एअर इंटेक आणि साइड पॅनेल्स देण्यात आले आहेत. बाईकच्या मिरर्स देखील बदलण्यात आले आहेत. सोबतच नवीन सायलेंसर दिला आहे, जो कॉम्पॅक्ट आहे. ट्रायम्फची ही नवीन बाईक सॅफायर ब्लॅक आणि मॅट सिल्वर आइस रंगात मिळेल.

Source – navbharattimes

नवीन बाईकच्या पुढील बाजूला 41एमएम शोवा एजस्टेबल अपसाइड डाउन फोर्क सस्पेंशन आणि रिअरमध्ये शोवा मोनशॉक मिळेल. फ्रंटला 310एमएम ट्विन डिस्क आणि रिअरला 220 एमएम डिस्क ब्रेक आहे. बाईकमध्ये ड्यूअल चॅनेल एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोलसारखे फीचर देण्यात आले आहे.