मागील वर्षी देशातील पहिली इंटरनेट कनेक्टेड कार एमजी हेक्टर सादर झाल्यानंतर ऑटो सेक्टरमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर अनेक कंपन्यांनी इंटरनेट कनेक्टेड कार बाजारात आणल्या. ग्राहक आता या कार्सला पसंती देताना दिसत आहेत. भारतीय बाजारात आज अनेक इंटरनेट कनेक्टेड कार्स आहेत. यांच्याविषयी जाणून घेऊया.
इंटरनेट कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहेत या टॉप कार्स

ह्युंडाई एलीट आय20, वेन्यू, ऑरा, क्रेटा, वरना आणि टूसों-
ह्युंडाई भारताची पहिली कंपनी आहे, जिने आपल्या सर्व कार्समध्ये इंटरनेट कनेक्टेड टेक्नोलॉजी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही ह्यूंडाई वेन्यूमध्ये कंपनीने सर्वात आधी कनेक्टेड टेक्नोलॉजी दिली होती. कंपनीने ऑटोलिंक नावाने एलीट आय20 आणि जून्या क्रेटामध्ये हे तंत्रज्ञान दिले होते. यात इंजिन स्टार्ट-स्टॉप, ऑटो लॉक-अनलॉक, मेंटनेंस, सर्व्हिस आणि रोडसाइड असिस्टेंस सारखे फीचर्स मिळतात. कंपनी यावर्षी लाँच होणाऱ्या ह्युंडाई आय20 मध्ये ब्ल्यूलिंक कनेक्टेड कार टेक्नोलॉजी देणार आहे. यात 33 कनेक्टेड फीचर्स मिळतात, ज्यातील 10 खासकरून भारतीय बाजारासाठी आहेत.

टाटा नेक्सॉन –
या वर्षीच्या सुरुवातीला लाँच झालेल्या 2020 टाटा नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये कंपनी अनेक नवीन फीचर दिले आहेत. कंपनीने यात नवीन कार कनेक्टेड टेक्नोलॉजी दिली आहे. नेक्सॉन पहिली कार आहे, ज्यात जिओ-फेसिंग, फाइंड-माय कार, लाईव्ह व्हिकल डायग्नोस्टिक, व्हिकल क्रॅश नॉटिफिकिशन सारखे फीचर्स दिले आहेत. हिंदी भाषेत दिलेले कमांड्स देखील ही कार समजते.

फोर्ड इकोस्पोर्ट, एस्पायर, फ्रीस्टाइल, फिगो आणि इंडेव्हर –
अमेरिकन कंपनी फोर्डने कनेक्टेड टेक्नोलॉजी फोर्डपास लाँच केली होती. ही टेक्नोलॉजी कंपनीने बीएस-6 इंजिन असणाऱ्या कॉम्पॅक्ट फोर्ड इको स्पोर्टसह सर्व फोर्ड मॉडेल्समध्ये दिली होती. 4जी डेटा कनेक्शनवर आधारित फोर्डपास सुरुवातीच्या 3 वर्षांसाठी मोफत आहे. यात स्टार्ट-स्टॉप, लॉक-अनलॉक सारखे फीचर्स आहेत. या अॅपसाठी फोर्ड व्हिकल टेस्ट ड्राइव्ह देखील बुक करता येते. ज्यात जिसमें रियल टाइम व्हिकल इन्फॉरमेशन, टायर प्रेशर, फ्यूल लेवल्स, ओटो रीडिंग, जवळील फ्यूल स्टेशन, फोर्ड डीलरशिपचा पत्ता आणि रोडसाइड असिस्टेंस सारख्या फीचर्सचा समावेश आहे.

एमजी हेक्टर, हेक्टर प्लस आणि झेडएस ईव्ही –
एमजी हेक्टर आपल्या कारमध्ये आयस्मार्ट कनेक्टिव्हिटी टेक्नोलॉजीचे फीचर देते. 4जी नेटवर्कवर आधारित या टेक्नोलॉजीमध्ये 24 तास इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळते. यात एम2एम एंबेडेड सिम, 5जीसाठी आयपीव्ही6 रेडी आणि ओव्हर द एअर अपडेट्स मिळतात. कारला रिमोटने स्टार्ट करता येते. एसी, सनरूफला रिमोटने ऑपरेट करणे शक्य आहे.

किआ सेल्टोस, कार्निव्हल, सोनेट –
किआ मोटर्सच्या या तीन कार्समध्ये यूव्हीओ कनेक्ट टेक्नोलॉजी देण्यात आलेली आहे. लवकरच लाँच होणाऱ्या सोनेटमध्ये ही टेक्नोलॉजी मिळेल. यूव्हीओ कनेक्टमध्ये 37 स्मार्ट फीचर्स आहेत. ज्यात रिमोट इंजिन स्टार्ट-स्टॉप, व्हाईस अॅक्टिवेटेड फीचर्सचा समावेश आहे. हेलो किआ बोलताच, हे हवामानाची माहिती, वेळ-तारीख, क्रिकेट स्कोर, मीडिया कंट्रोल, नेविगेशन, क्लाइमेट कंट्रोल, इमर्जेंसी असिस्टेंस, रोडसाइड असिस्टेंस, व्हिकल ट्रेकिंग आणि इमोबिलाइजर्स सारखे फीचर्स अॅक्टिवेट करते.

महिंद्रा एक्सयूव्ही 500 आणि एक्सयूव्ही 300 –
महिंद्राच्या कनेक्टेड कार टेक्नोलॉजीचे नान ब्ल्यूसेन्स असून, जी या दोन्ही कारमध्ये मिळते. स्मार्ट वॉचद्वारे ऑडिओ कंट्रोल्स, ऑटो एसी फंक्शंस आणि व्हिकलसंबंधीत माहिती मिळते. सोबतच लोकेट माय व्हिकल, टायर प्रेशर, जवळील पेट्रोल पंप, इमर्जेंसी कॉल असिस्ट सारखे फीचर्स मिळतात.

निसान किक्स –
निसान सध्या आपल्या या क्रॉसओव्हर एसयूव्हीमध्ये निसान कनेक्ट सेवा देता आहे. कंपनी आपली आगामी कार मॅग्नाइटमध्ये देखील हेच फीचर देईल. निसान किक्समध्ये मिळणाऱ्या या फीचर्समध्ये जिओ फेसिंग, स्पीड अलर्ट्स, टो अलर्ट, लोकेशन बेस्ट सेवेचा समावेश आहे.

जीप कंपास –
जीप इंडियाने आपल्या कंपास या कारमध्ये यूकनेक्ट अॅप फीचर दिले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे यूजर्स रिमोट इंजिन स्टार्ट-स्टॉप आणि क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स एक्सेस करू शकतात. इंफोटेनमेंट सिस्टमला दरवर्षी अपडेट मिळते. व्हिकल फेंडरद्वारे कारचे लोकेशन, लाइट फ्लॅश आणि हॉर्न देखील वाचवता येतो.