ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार

अमेरिकेत व्हाईट हाऊसच्या बाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रम्प यांनी स्वतः या घटनेची माहिती पत्रकारांनी दिली. आता स्थिती नियंत्रणात आहे.

सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी त्वरित गोळीबार करणाणाऱ्यावर कारवाई केली. अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात आरोपीला गोळी लागली असून, त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रपती ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली की, व्हाईट हाऊस बाहेर गोळीबार झाला आहे. मात्र आता स्थिती नियंत्रणात आहे. मी सिक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्वरित आणि प्रभावी कार्यासाठी धन्यवाद देतो. एका व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. असे वाटत आहे की, त्या व्यक्तीला सिक्रेट सर्व्हिसकडून गोळी लागली आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी त्वरित राष्ट्रपती ट्रम्प यांनी सुरक्षित ठिकाणी नेले. यानंतर ट्रम्प पुन्हा परतले व त्यांनी पत्रकारांना घटनेची माहिती दिली.