रशियाच्या कोरोना लसीला जबदस्त मागणी, 20 देशांनी दिली 1 अब्ज डोसची ऑर्डर

गेली अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या रशियाच्या कोरोना प्रतिबंधक लसीला अखेर अधिकृत मंजूरी रशियाने दिली आहे. रशियाच्या राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली. सोबतच त्यांच्या मुलींना देखील या लसीचा डोस देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रशियाने या लसीला सोव्हियत सेटेलाईटवरून स्पुटनिक व्ही असे नाव दिले आहे.

रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडचे Kirill Dmitriyev यांनी या लसीसाठी निधी दिला आहे. त्यांनी सांगितले की, उद्यापासून लसीचे 3 टप्प्यातील ट्रायल सुरू होईल व सप्टेंबरमध्ये लसीचे उत्पादन सुरू होण्याची आशा आहे. त्यांनी माहिती दिली की, गमलेया इंस्टिट्यूटने बनवलेल्या या लसीमध्ये इतर देश देखील रस दाखवत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात 20 देशांनी 1 बिलियन पेक्षा अधिक डोसची मागणी केली आहे.

परदेशी भागीदारांसोबत मिळून रशिया 5 देशांमध्ये या लसीचे उत्पादन करणार असून, वर्षाला 500 मिलियन डोसचे निर्मिती करणार आहे. इतर देशांनी देखील आमच्याशी सुसंवाद साधत स्वतःच्या देशातील नागरिकांना भविष्यात लस द्यावे. जेणेकरून, त्यांचे प्राण वाचतील व महामारीवर मात करता येईल, असेही आवाहन त्यांनी केले.