मोदींच्या नावावर 2024 मध्ये सत्ता मिळणार नाही, काम करावे लागेल – राम माधव

भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी पक्षातील नेत्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काम करण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर अवलंबून न राहता, 2024 साठी राज्यात सत्ता मिळवण्यासाठी संपुर्ण तयारीने कामावे लागावे असा सल्ला दिला आहे. राम माधव हे आंध्र प्रदेशमधील पक्षातील नेत्यांना संबोधित करत होते.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, राम माधव म्हणाले की, मोदींच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढाई करण्यासाठी उतरण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही असे केल्यास त्याच एक टक्क्यांवर राहल. मोदी पुढील 10-15 वर्ष पंतप्रधान राहतील. आपण त्यांच्या सुशासन आणि लोकांसाठी लाभदायक असलेल्या कार्यक्रमांद्वारे लाभ घेऊ, मात्र एवढेच पुरेसे नाही. उद्देश एक शक्तिशाली ताकद म्हणून पुढे येण्याचा आहे.

राम माधव यांच्या उपस्थितीमध्ये यावेळी आंध्र प्रदेशच्या भाजप अध्यक्षपदी सोमू वीरराजू यांची नियुक्ती करण्यात आली. माधव म्हणाले की, आंध्र प्रदेशात विरोधी पक्षाच्या स्थितीमध्ये एक रिकामेपण आहे. आपल्याला ती रिक्त जागा भरायची आहे आणि 2024 मध्ये सत्ते येण्यासाठी संपुर्ण जोर लावायचा आहे.