माउथवॉशने गुळण्या केल्याने कमी होऊ शकतो कोरोना व्हायरसचा संसर्ग, वैज्ञानिकांचा दावा

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. वैज्ञानिक अभ्यानंतर वेगवेगळे दावे करत आहेत. आता वैज्ञानिकांनी एका अभ्यासाच्या आधारावर दावा केला आहे की, बाजारात उपलब्ध माउथवॉशच्या गुळण्या केल्याने तोंडातील आणि घशातील कोरोना व्हायरसची संख्या कमी होऊ शकते. जर्मनी येथील Ruhr University Bochum च्या वैज्ञानिकांनी माउथवॉशचा उपयोग आणि कोरोना व्हायरसबाबत अभ्यास केला आहे.

या अभ्यासात माउथवॉशचा वापर केल्याने कोरोना व्हायरस नष्ट होतो, असा दावा करण्यात आलेला नाही. मात्र वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरस रुग्णांच्या तोंडात आणि घशात मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस असतात. माउथवॉशच्या वापराने व्हायरसच्या कणांना इनएक्टिव्हेट करता येईल. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, तोंडातील आणि घशातील व्हायरसचे प्रमाण कमी झाल्यास, कमी कालावधीमध्ये संसर्गाचा धोका देखील कमी होऊ शखतो.

Journal of Infectious Diseases मध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. वैज्ञानिकांनी सोबतच चेतावणी दिली आहे की, माउथवॉश कोरोना संसर्गासाठी उपयुक्त उपचार नाही व माउथवॉशमुळे संसर्ग पुर्णपणे रोखता देखील येत नाही.

या अभ्यासात म्हटले आहे की, संसर्ग हा प्रामुख्याने संक्रमित व्यक्तीच्या श्वासातून सोडण्यात आलेल्या व्हायरसच्या कणांच्या संपर्कात आल्याने होतो. यामुळे माउथवॉशच्या गुळण्या केल्याने संसर्गाचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. मात्र या विषयावर अध्याप क्लिनिकल रिसर्च सुरू आहे.