अंदमान-निकोबरमधील अंडरवॉटर ऑप्टिकल फायबरमुळे होणार हा फायदा

अंदमान व निकोबारसाठी समुद्राच्या खाली टाकण्यात आलेल्या ऑप्टिकल सायबर केबलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ही केबल सुरू झाल्यानंतर अंदमान-निकोबारला हाय-स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट मिळेल व सोबतच व्यापार आणि पर्यटनला देखील प्रोत्साहन मिळेल. 2018 मध्ये पंतप्रधान मोदींनीच या प्रकल्पाचा शुभारंभ केला होता.

आता लाँचिंगनंतर एअरटेलने बेटावर अल्ट्रा फास्ट 4जी सेवा सुरू केली आहे. या ऑप्टिकल फायबरचे काय फायदे आहेत, ते जाणून घेऊया.

या ऑप्टिकल केबलचे फायदे –

 • समुद्राच्या आत 2300 किमीपर्यंत ही सबमरिन ऑप्टिकल केबल टाकण्यात आलेली आहे. यासाठी 1224 कोटी रुपये खर्च आला आहे.
 • अंदमानमधील बीएसएनएल ब्रॉडब्रँडचा स्पीड 10 पटींनी वाढला.
 • 20 पट अधिक डेटा डाउनलोडची सुविधा
 • 100 एमबीपीएस पर्यंत स्पीड
 • बीएसएनएलच्या सर्व प्लॅनचा स्पीड 2-10 पटीने वाढला.
 • डेटा डाउनलोडिंगची सुविधा एका महिन्यात 60 जीबी वरून 1500 जीबीपर्यंत.
 • पॅक समाप्त झाल्यानंतर स्पीड 512 केबीपीएसवरून वाढवून 2 एमबीपीएस करण्यात आला.
 • बीएसएनएल एफटीटीएच ग्राहकांसाठी 1000 एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट मिळेल.
 • चेन्नई आणि पोर्ट ब्लेयरमध्ये 400जीबीपीएस आणि इतर बेटांवर 200जीबीपीएस बँडविड्थ इंटरनेट या केबलद्वारे मिळेल.

कोणाला होणार फायदा ?

 • यामुळे टेलिमेडिसन आणि टेलि-एज्यूकेशन सारख्या ई-गव्हर्नेंस सारख्या सेवांच्या विस्तारस मदत होईल.
 • बेटावर ऑनलाईन शिक्षण, बँकिंग, शॉपिंगला मदत होईल.
 • लहान व्यापाऱ्यांना ई-गव्हर्नेंसचा फायदा मिळेल.
 • याच्या लाँचिंगमुळे बेटावरील इंटरनेटची किंमत कमी होईल.