कृष्णभक्तीत लीन झाला आहे फोर्ड कंपनीच्या संस्थापकाचा नातू, स्विकारला हिंदू धर्म

बंगालच्या नदिया जिल्ह्यातील मायापूर येथे 113 मीटर उंच श्रीकृष्णाच्या मंदिराचे बांधकाम सध्या सुरू आहे. हे मंदिर पुढील 2 वर्षात बांधून पुर्ण होईल. श्री मायापूर चंद्रोदय नावाच्या या मंदिराची निर्मिती कृष्मभक्त अंबरीश दास हे करत आहे. अंबरीश दास यांचे मूळ नाव अल्फ्रेड फोर्ड असून, ते जगप्रसिद्ध कार कंपनी फोर्डच्या मालकाचे नातू आहेत.

Image Credited – Quora

अल्फ्रेड हे कृष्णभक्त आहेत. अल्फ्रेंड यांच्या प्रयत्नातून मंदिराचा एक भाग एक लाख वर्गफूटात तयार झाला आहे व 2022 मध्ये मंदिराचे काम पुर्ण होईल. अल्फ्रेड म्हणतात की, कृष्णभक्तीने त्यांना पुर्णत्व मिळाले आहे. जन्म घेतल्यानंतर भौतिक सुख, संसाधन, संपत्ती पायावर लोळण घालत होती. मात्र आतून मला रिकामेपण जाणवत होते. हाच रिक्तपणा भरण्यासाठी मी शोध सुरू केला आणि याच क्रमात महाराज श्रीपाल प्रभूपाद यांच्याशी भेट झाली. यानंतर मला श्रीकृष्णाद्वारे ती रिक्तजागा सापडली.

Image Credited – jagran

त्यांनी सांगितले की, हे मंदिर माझ्या गुरु महाराजांचे स्वप्न आहे. याचे निर्माण करून त्यांच्या पायावर समर्पित करणे हे माझे लक्ष्य आहे. आपण अशा जगात राहतो, जेथे सर्वजण महत्वाकांक्षी आहेत. लोकांनी ते सर्वकाही हवे आहे, जे त्यांच्याकडे नाही. त्यामुळे येथे नेहमी प्रतिस्पर्धा आहे. मात्र सर्वकाही येथेच राहते. त्यामुळे मी आणि माझ्या पत्नीने या अध्यात्मिक संसारात सर्व मोहमायापासून लांब आहे. ही प्रसन्नता स्थायी आहे.

Image Credited – Highvelder

अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या अल्फ्रेड फोर्ड यांची आता अंबरीश दास हीच ओळख आहे. ते फोर्ड मोटर्सचे संस्थापक हेनरी फोर्डचे नातू आहेत. ते कंपनीतील बोर्डाचे सदस्य देखील आहेत. ते दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये  गौर पौर्णिमा महोत्सवासाठी कुटुंबासह मायापूर येथे येत असतात. येथे ते 800 कोटींच्या मंदिराची निर्मिती करणार आहेत. यातील 250 कोटी ते स्वतः देणार आहेत, तर इतर रक्कम फंडद्वारे जमा करत आहेत. अल्फ्रेड यांनी इस्कॉनचे संस्थापक स्वामी श्रील भक्तिवेदांत प्रभुपाद यांची कृष्णभक्तीवर आधारित पुस्तके वाचल्यानंतर ते श्रीकृष्णाकडे आकर्षित झाले. 1975 साली त्यांनी हिंदू धर्म स्विकारत आपले नाव अंबरीश दास ठेवले. यानंतर 1984 मध्ये नदिया जिल्ह्यातीलच कृष्णभक्त शर्मिला भट्टाचार्यासोबत लग्न केले.