व्हॉट्सअ‍ॅप आणणार शानदार फीचर, डिव्हाईस बदलल्यानंतरही डिलीट होणार नाही चॅट

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप नवनवीन फीचरवर काम करत आहे. काही दिवसांपुर्वींच व्हॉट्सअ‍ॅपने फेक न्यूज रोखण्यासाठी सर्च फीचर जारी केले आहे. आता कंपनी अशा फीचरवर काम करत आहे, ज्यात डिव्हाईस बदलल्यानंतर देखील व्हॉट्सअ‍ॅप चॅट हिस्ट्री डिलीट होणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅप सिंकिंग फीचरवर काम करत आहे. याचा अर्थ युजरने आपला फोन बदलला, तरी देखील तुमच्या आधीच्या फोनमधील चॅट हिस्ट्री नवीन फोनमध्ये दिसेल. सध्या फोन बदलल्यानंतर जुने मेसेज आपोआप डिलीट होतात. त्यामुळे हे नवीन फीचर फायदेशीर ठरणार आहे.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप लवकरच चॅट सिंकिंग फीचर जारी करणार आहे. हे फीचर मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचरसोबतच रोल आउट केले जाऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचर देणार आहे. हे फीचर आल्यानंतर युजर एकाच नंबरवरील व्हॉट्सअ‍ॅप 4 वेगवेगळ्या डिव्हाईसवर वापरू शकतील.

व्हॉट्सअ‍ॅप एक्सपायरिंग मेसेजचे टेस्टिंग देखील बिटा व्हर्जनवर करत आहे. या फीचरमुळे एका ठराविक वेळेनंतर मेसेज आपोआप डिलीट होतील.