विराट ठरला गुगलवर सर्वाधिक सर्च्ड केलेला क्रिकेटपटू

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे केवळ भारतातच नाहीतर जगभरात चाहते आहेत. हे पुन्हा एकदा आता सिद्ध झाले आहे. एका अभ्यासात समोर आले की, 31 वर्षीय विराट कोहली जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. सोबतच भारतीय संघ देखील सर्वात लोकप्रिय टिम असल्याचे समोर आले आहे.

एसईएमरश या संस्थेने केलेल्या अभ्यासात आढळले की, भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृति मंधानाने ऑनलाईन सर्चमध्ये भारतीय पुरुष संघातील अनेक खेळाडूंना मागे टाकले आहे. या अभ्यासात आढळले की, विराट कोहलीला जानेवारीपासून ते जूनपर्यंत प्रत्येक महिन्याला  16.2 लाख वेळा ऑनलाईन सर्च करण्यात आले. तर टीम विराट कोहली देखील प्रत्येक महिन्याला 2.4 लाख वेळा सर्च करण्यात आले

. या व्यतिरिक्त रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, जॉर्ज मॅके, जोश रिचर्ड्स, हार्दिक पांड्या, सचिन तेंडूलकर, क्रिस मॅथ्यूज आणि श्रेयस अय्यर हे खेळाडू सर्चच्या बाबतीत टॉप-10 मध्ये आहेत. या सर्व खेळाडूंना प्रत्येक महिन्याला क्रमशः 9.7, 9.4, 9.1, 7.1, 6.7, 5.4, 4.1 आणि 3.4 लाख वेळा सर्च करण्यात आले.

क्रिकेटप्रेमींनी महिला खेळाडूंना देखील मोठ्या प्रमाणात सर्च केल्याचे आढळून आले. सर्वाधिक सर्चमध्ये भारतीय क्रिकेटपूट स्मृति मंधाना 12व्या तर एलसी पेरी 20व्या स्थानावर आहे. या महिला खेळाडूंनी युवराज सिंह, शिखर धवन सारख्या खेळाडूंना मागे टाकले आहे.