मग तुमची रणबीरला ‘रेपिस्ट’, दीपिकाला ‘सायको’ म्हणायची हिंमत का होत नाही?


आपल्या सडेतोड आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे बॉलीवूडची क्वीन अर्थात कंगना राणावत ही कायम चर्चेत असते. पण सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर हीच कंगना काहीशी आक्रमक झाल्याचे सध्यातरी पाहायला मिळत आहे. त्यातच ती दररोज अनेक बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर आरोप करत आहे. महेश भट, करण जोहर, आलिया भट, आयुष्यमान खुराणा अशा सर्वांना लक्ष्य करणाऱ्या कंगनाने आता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्यावर देखील तोफ डागली आहे. रणबीर व दीपिकाबद्दल असे काही ट्विट कंगनाच्या वतीने तिच्या टीमने केले की, ते वाचून नेटकरी देखील सुन्न झाले आहेत.

कंगणाच्या टीमने रणबीर व दीपिकावर निशाणा साधताना म्हटले आहे, की रणबीर कपूर हा एक सीरिअल स्कर्ट चेजर व्यक्ती आहे. पण त्याला रेपिस्ट म्हणण्याची हिंमत कोणीही करू शकत नाही. दीपिका पादुकोण ही स्वयंघोषित मानसिक रूग्ण आहे. पण तिला कोणीही ‘सायको’ म्हणत नाही. कदाचित सामान्य कुटुंबातून, लहान शहरांमधून आलेल्या आऊटसाइडर्ससाठी या उपमा राखीव आहेत.

सध्या सोशल मीडियावर कंगनाचे हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे. त्यावर सोशल मीडिया युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कंगनाने केवळ बॉलिवूडमधील नेपोटिजमचा मुद्दाच उचलून धरलेला नाही तर बॉलिवूडमध्ये आऊटसाईडर असूनही या मुद्यावर गप्प बसणाऱ्या कलाकारांवरही टीका केली आहे. यापूर्वी एका मुलाखतीत तिने तापसी पन्नू आणि स्वरा भास्करला लक्ष्य केले होते.