मोदी सरकारने कोरोना योद्धांचा विश्वासघात केला, राहुल गांधींची जोरदार टीका

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना योद्धा दिवस-रात्र काम करत आहेत. आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा कोरोना व्हायरस महामारीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

त्यांनी ट्विटरवर एक बातमी शेअर करत मोदी सरकारवर कोरोना योद्धांचा विश्वासघात करण्याचा आरोप केला आहे. कोरोना योद्धांना मदत करण्यासपासून सरकार हात काढून घेत विश्वासघात करत असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी ट्विट केले की, कोरोना वॉरियर्ससाठी टाळी-थाळी वाजवून जनतेने मोदींजींवर विश्वास ठेवला. पंरतू मोदी सरकारने कोरोना वॉरियर्सची मदत करण्यापासून मागे सरकत विश्वासघात केला आहे. सरकारने कोरोना वॉरियर्सला सुरक्षा, सन्मान आणि सुविधा द्यायला हवी.

कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले असून, आतापर्यंत जवळपास 200 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. भारतीय आरोग्य संघटनेने देखील सरकारला या मुद्याकडे लक्ष देण्याचा आग्रह केला आहे. याच बातमीवरून राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आहे.