सोन्याचा मुलामा असलेल्या महात्मा गांधींच्या चष्म्याचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव

महात्मा गांधींनी 1900 च्या दशकात घातलेल्या एका चष्म्याचा ब्रिटनमध्ये लिलाव होणार आहे. या चष्म्याला सोन्याचा मुलामा असून, महात्मा गांधींनी हा चष्मा भेट म्हणून दिला होता. या चष्म्याला लिलावात 10 हजार ते 15 हजार पाउंड (जवळपास 9.77 लाख ते 14.46 लाख रुपये) मिळण्याची शक्यता आहे.

Image Credited – India.com

लिलाव करणारी कंपनी ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन्सने म्हटले की, एका पाकिटात चष्मा ठेवून त्यांच्या  डाकपेटीत हा चष्मा टाकण्यात आला होता. याच्या इतिहासाबद्दल माहिती मिळताच आश्चर्य वाटले. कंपनीचे अँटी स्टोव्ह म्हणाले की, चष्म्याचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे. विक्रेत्याने ही गोष्ट खास असल्याचे तर मान्य केलेच, मात्र याची किंमत सांगितली नाही. उलट चष्मा काही कामाचा नसल्यास नष्ट करण्यास सांगितला. पंरतू जेव्हा आम्ही त्यांना याची किंमत सांगितले, त्यावेळी ते देखील हैराण झाले.

इंग्लंडच्या एका वृद्ध व्यक्तीच्या कुटुंबाकडे हा चष्मा होता. व्यक्तीने सांगितले की, हा चष्मा त्यांच्या काकाला महात्मा गांधींनी भेट म्हणून दिला होता.  21 ऑगस्टला लिलाव होणाऱ्या या चष्म्यात अनेकांनी रस दाखविण्यास सुरुवात केली आहे. भारतातील लोक देखील खरेदी करण्यासाठी रस दाखवत असून, आतापर्यंत 6 हजार पाउंड्सची ऑनलाईन बोली देखील लागलेली आहे.