अपशब्दांचा वापर करत कंगना राणावतची आयुष्मान खुराणावर गंभीर टीका


आपल्या सडेतोड आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे बॉलीवूडची क्वीन अर्थात कंगना राणावत ही कायम चर्चेत असते. पण सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर हीच कंगना काहीशी आक्रमक झाल्याचे सध्यातरी पाहायला मिळत आहे. त्यातच ती दररोज अनेक बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर आरोप करत आहे. नुकताच तिच्या आरोपांचा अभिनेता आयुष्मान खुराणा शिकार बनला आहे. आयुष्मान खुराणाने काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते. ज्यावरुन कंगना कमालीची संतापली आहे. त्यावरुन कंगनाने आयुष्मानचा चक्क ‘चापलूस आउटसायडर’ असा उल्लेख केला.

गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरून कंगना अनेक कलाकारांवर कंपूशाही आणि घराणेशाहीचा आरोप करत आहे. त्यातच आता तिने आउटसाइडर्स कलाकारांवर टीका सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी तिने महेश भट्ट, करण जोहर, सलमान खान आणि आलिया भट्टसहीत अनेकांवर टीका केली आहे. आता तिने बॉलीवूडचा स्वयंघोषित सिनेसमिक्षक कमाल आर खानचे एक ट्विट रिट्विट करत आयुष्मानवर निशाणा साधला आहे.

आयुष्मानबाबत एक ट्विट कमाल आर खान याने केले होते. त्याने ज्यात आयुष्मान हा तीन कारणांमुळे नेपोटिज्म आणि स्टार किड्सना सपोर्ट करतो हे सांगितले. त्याच्यानुसार ती तीन कारणे म्हणजे, १) आयुष्मानला बॉलिवूडमध्ये रहायचे आहे. २) तो यशराज फिल्म्सचा कलाकार आहे. ३) सुशांत सिंह राजपूत हा त्याचा स्पर्धक होता. केआरके एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने लिहिले की, घाबरू नकोस, तुझे देखील चित्रपट येतील आणि त्यातून तुला जनताच उत्तर देईल, ऑल दी बेस्ट.

कंगनाची नजर केआरकेच्या याच ट्विटवर पडली. तिनेह ट्विट रिट्विट केले. पण कमेंट करताना आयुष्मानचे नाव घेणे टाळले. कंगनाने ट्विटमध्ये लिहिले की, केवळ एका कारणाने चापलूस आउटसाइडर्स माफियांना सपोर्ट करतात. ते आहे त्यांच्या विचारातील सामान्यता. इंडस्ट्रीतून त्यांना कुणी धमकावत नाही. ते कंगना आणि सुशांतसारख्या लोकांची खिल्ली उडवतात आणि ते खरे काही सांगत नाहीत.