व्हिडीओ : इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा भडका, हवेत 5 किमी उंचीपर्यंत धुर-राखेचे ढग

इंडोनेशियाच्या माउंट सिनाबुंग ज्वालामुखीचा पुन्हा एकदा उद्रेक झाला असून, हवेत जवळपास 5 किमी उंचीवर राख आणि धूराचा थर पाहण्यास मिळत होता. या काळ्या धुरामुले परिसरात अंधार दाटला होता. या सुमात्रा बेटावर 2010 सालापासून ज्वालामुखी भडकत आहेत. 2016 साली येथे मोठा धमाका झाला होता.

आज झालेल्या स्फोटात कोणाचाही मृत्यू अथवा कोणीही जखमी झालेले नाही. मात्र अधिकाऱ्यांनी वेगाने निघणारा लावा आणि स्फोटाबाबत चेतावणी जारी केली आहे. आकाशातील जवळपास 5 किमी उंचीपर्यंत धूराच्या फुगाच तयार झाला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंडोनेशियाचे वॉल्केनोलॉजी आणि जियोलॉजिकल हेजाड मिटिगेशनचे स्थानिक अधिकारी एरमेन पुतेरा म्हणाले की, सिनाबुंगच्या रेड झोनपासून वाचण्यासाठी आम्हा सर्वांना चेतावणी जारी करण्यात आली आहे. या उद्रेकामुळे आजुबाजूज्या परिसरात राख पसरली आहे.

ज्वालामुखीच्या उद्रेकाने कोरोना महामारीच्या स्थितीने परिस्थिती अधिकच गंभीर केली. घाबरलेले स्थानिक लोक विना मास्कचेच एकत्र जमा झाले होते.