… म्हणून रायडूची 2019च्या वर्ल्डकप टीममध्ये झाली नव्हती निवड

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलच्या सामन्यात भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. या पराभवासोबतच आणखी एका गोष्टीची चर्चा आजही होते, ती म्हणून अंबाती रायडूचा संघामध्ये समावेश न करणे. अंबाती रायडूचा संघात समावेश न केल्याने त्यावेळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. आता त्यावेळेसचे निवड समितीचे सदस्य गगन खोडा यांनी यामागचे कारण सांगितले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील पराभवाविषयी गगन खोडा म्हणाले की, भारताचे प्रदर्शन वर्ल्ड कपमध्ये खराब नव्हते. ते एक दिवस खराब असणे विशेष बाब होती. न्यूझीलंडच्या विरुद्ध आमचा दिवस खराब होता.

एक वेबसाईट्सशी बोलतान गगन कोडा अंबाती रायडूविषयी म्हणाले की, वर्ल्ड कप पुर्वी अंबाती रायडूचा आत्मविश्वास ढासळला होता आणि त्यावेळी तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये देखील नव्हता. आम्ही त्याला जवळपास 1 वर्ष संघात ठेवले, मात्र तो सुस्त होत चालला होता. वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत अंबातीमध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसत होता. आम्ही एखाद्या युवा खेळाडूला देखील घेऊ शकत नव्हतो, कारण वर्ल्ड कप इंग्लडमध्ये सुरू होता.

अंबातीला संघात न घेतल्याने त्यावेळी बीसीसीआयवर चारही बाजूंनी टीका झाली होती. स्वतः अंबाती रायडूने निवड समितीवर टीका करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र नंतर त्याने हा निर्णय मागे घेतला.