माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण


नवी दिल्ली – देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

दरम्यान काही वेगळ्या कारणांसाठी प्रणब मुखर्जी हे हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेव्हा त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ट्विटरवरून याची माहिती देताना त्यांनी आठवडाभरात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन केले आहे. 84 वर्षीय प्रणब मुखर्जी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना सेल्फ आयसोलेट करून कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.