कोण आहे Binod ? सोशल मीडियावर का सुरू आहे फक्त त्याच्याच नावाची चर्चा ?

मागील वर्षी JCB ki khudayi हा विचित्र हॅशटॅग अचानक ट्रेंडमध्ये आला होता. यावर्षी अशाच एका विचित्र ट्रेंडची आता चर्चा सुरू झाली आहे. इंटरनेटवर सध्या एकाच नावाची चर्चा आहे ते म्हणजे बिनोद. मागील काही दिवसांपासून अनेक ब्रँड आणि सोशल मीडिया युजर्स बिनोदबाबत ट्विट करत आहेत. पेटीएमने आपले नाव बदलून बिनोद केले. तर मुंबई पोलिसांनी बिनोद नावाच्या लोकांना आवाहन केले की, जर तुम्ही तुमचे नाव पासवर्ड म्हणून ठेवत असाल, तर त्वरित बदला.

एअरटेलने देखील म्हटले की, हा बिनोद बोल, सोबत प्रत्येक कॉल येईल. हॅकर एलियन एल्डर्सनने देखील आपल्या फॉलोअर्सला त्याला बिनोद नावाने हाक मारण्यास सांगितले. ट्विटरवर बिनोद नावाने अनेक मिम्स आणि जोक्स व्हायरल होत आहेत.

मात्र हा बिनोद नक्की आला कोठून ? हे जाणून घेऊया. याची सुरुवात युट्यूब चॅनेल स्ले पाँईंटच्या एका व्हिडीओने झाली. जेथे क्रिएटर्स अभ्युदय आणि गौतमीने युट्यूब व्हिडीओवरील कमेंट्स वाचून दाखवण्यास सुरूवात केली. या कमेंट्सवर त्यांनी एक स्पेशल व्हिडीओच शेअर केला. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘Why indian comment section is garbage (Binod)’ असे शीर्षक दिले. त्यांनी व्हिडीओमध्ये कमेंट्सतर वाचल्याच, यावेळी एक बिनोद थारू नावाच्या एका युजरची कमेंट दाखवली. युजरने बिनोद सोडून काहीच नव्हते लिहिले.

हा व्हिडीओ काही मिनिटातच व्हायरल झाला आणि युट्यूबवर टॉप ट्रेंड करू लागला. युजरनी या व्हिडीओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये बिनोद लिहून पाऊसच पाडला. युट्यूबनंतर ट्विटरवर देखील हा ट्रेंड झळकला. लोकांनी यावर मिम्स शेअर करण्यास सुरूवात केल्यानंतर, सर्वत्र फक्त बिनोदची चर्चा सुरू झाली.