इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींनी उघडले हिंदी ट्विटर अकाउंट

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी हिंदी भाषेतून आपले अधिकृत ट्विटर अकाउंट उघडले आहे. नवीन हिंदी अकाउंटमध्ये त्यांचा बायो ‘इस्लामी क्रांति के सर्वोच्च नेता’ हा देखील हिंदीमध्ये आहे.

आतापर्यंत त्यांच्या अकाउंटला जवळपास 3 हजार फॉलोअर्स असून, त्यांनी 2 ट्विट केले आहेत. अयातुल्ला खोमेनी यांचे आधीपासूनच फारसी, अरबी, उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश आणि इंग्रजी भाषेसह अन्य भाषेतील ट्विटर अकाउंट आहेत. अद्याप खामेनी यांनी आपल्या या नवीन अकाउंटवरून कोणत्याही भारतीय नेत्याला फॉलो केलेले नाही. त्यांच्या या अकाउंटवरून त्यांच्या दुसऱ्या भाषेत अकाउंट्सला फॉलो करण्यात आलेले आहे. मात्र अद्याप त्यांचे हे अकाउंट व्हेरिफाईड झालेले नाही.

अयातुल्ला खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते आहेत. ते 1981 ते 1989 पर्यंत इराणचे राष्ट्रपती होते. 1989 पासून ते आतापर्यंत अयातुल्ला खामेनी हे मध्य पूर्वेत एखाद्या राष्ट्राचे सर्वाधिक काळ राष्ट्रप्रमूख राहिलेले आहेत.