सोशल मीडियावर महिला आयएएस अधिकाऱ्याच्या नावे तब्बल 16 फेक अकाउंट्स


मुंबई : सोशल मीडियात सेलिब्रेटींची फेक अकाऊंट असल्याचे आपण आजवर ऐकले असेल, पण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या फेक अकाऊंट असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार यशस्वी मॉडल ते स्पर्धा परीक्षेतील टॉपर असणाऱ्या तरुणीसोबत घडला असल्यामुळे ज्यामुळे तिच्या पाया खालची जमिनच सरकली आहे.

नुकत्याच जाहिर झालेल्या युपीएससी या स्पर्धा परीक्षेच्या निकालात देशातून 93व्या स्थानासह उत्तीर्ण झालेल्या ऐश्वर्या श्योराण या तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. तब्बल 16 बनावट अकाऊंट सोशल मीडियावर तिचे बनवण्यात आल्याचे तिला तिच्या नातेवाईकांकडून कळाले आणि तिने तात्काळ याची माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे.

मॉडेल ऐश्वर्या श्योराण, माजी मिस इंडिया, फायनालिस्ट मिस इंडिया आणि सैन्य दलातील एका कर्नलची मुलगी ते युपीएससी टॉपर आणि आता आयएएस अधिकारी असलेली तरुणी ही तरुणी एकाकी प्रकाश झोतात आल्यामुळे तिच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा चहू बाजूंनी वर्षाव होऊ लागला. पण हे सर्व सुरु असताना या सर्व आनंदावर विरजन पडेल अशी एक घटना ऐश्वर्या सोबत घडली. ज्यामुळे ऐश्वर्याचा आनंद क्षण भंगूर ठरला.

तिला तिच्या सोशल मिडियावरील अकाऊंटवर हजारो नेटकऱ्यांनी अभिनंदनाचे मेसेज केले. त्यात तिचे जवळचे आणि नातेवाईक देखील होते. पण त्या मेसेजवर ऐश्वर्या काहीच रिप्लाय करत नसल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी तिला फोन केल्यानंतर ऐश्वर्याची अनेक बनावट अकाऊंट सोशल मीडियावर तयार करण्यात आल्याचे उघड झाले.

आपली बनावट सोशल अकाऊंट बनवून त्यावर आपल्या नावे पोस्ट केल्या जात असल्याबाबत तिने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधाला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या बनावट सोशल मिडिया खात्यांबाबत ते आता चौकशी करत आहेत. पण अशी बनावट खाती का आणि कशी बनवली जातात? ते ही माहिती करुन घेणे गरजेचे आहे.

एका मोठ्या बनावट सोशल मीडिया फॉलोअर्स प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची अपराध शाखा करत आहे. ज्यात बादशाह सारख्या जगप्रसिद्ध गायकासह अनेक बॉलिवूड आणि विविध क्षेत्रांतील मोठ्या मोठ्या लोकांची चौकशी अपराध शाखेने केली आहे. आता त्यात आयएएस अधिकारी ऐश्वर्या श्योराण यांच्या प्रकरणाची भर पडली आहे.