गणेशभक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने 127 वर्षांची परंपरा खंडीत करणार दगडूशेठ गणपती ट्रस्ट


पुणे : राज्याभोवती आवळलेला कोरोनाचा फार्स दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत असल्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव साधेपणात साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी नाकारली असल्यामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी स्वत;हून पुढाकार घेत घेतला आहे. त्यानुसार आता पुण्यातील जगप्रसिद्ध दगडूशेठ गणपती ट्रस्टनेही यंदाचा गणेशोत्सव मंदिरातच साजरा होईल, असे जाहीर केल्यामुळे गेल्या 127 वर्षांच्या परंपरेत प्रथमच खंड पडणार आहे.

पुण्यातील दरवर्षी दगडूशेठ गणपती उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे विराजमान होतो. पण, ही गेल्या 127 वर्षांची परंपरा यंदा प्रथमच खंडित होत आहे. पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला होणारी अलोट गर्दी पाहता रस्त्यावरील उत्सव मंदिरात घेण्यात येणार आहे. उत्सव मंदिरामध्ये साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.