केंद्रीय गृहमंत्र्यांची कोरोनावर मात, पण रुग्णालयातून डिस्चार्ज नाही


नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली असून त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना 2 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात शहा यांच्यावर उपचार सुरु होते.

शहा यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला, तरी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. शहा यांची दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. 2 ऑगस्ट रोजी अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शहा यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले होते. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले होते.