सोनू सूदची देशवासीयांना कळकळीची विनंती; म्हणाला…


कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून देशभरातील लाखो लोकांना या जीवघेण्या रोगाची लागण झाली आहे. त्याचबरोबर या रोगाचा प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बहुतांश लोकांची या लॉकडाऊनमुळे नोकरी गेली आहे. पण या रोगावर अद्याप कोणतेही ठोस असे औषध आलेले नाही. अशा संकटकाळात गरजवंतांची मदत करा, अशी कळकळीची विनंती केली आहे. जे सक्षम आहेत त्यांनी पुढे या अन् किमान एका गरीब रुग्णाच्या औषधांचा खर्च उचला, अशी विनंती त्याने केली आहे.

कृपया गरजवंतांची मदत करा. आर्थिकदृष्ट्या जे सक्षम आहेत त्यांनी पुढे या आणि कोरोना रुग्णांना मदत करा. गरीब रुग्णांना दत्तक घ्या किंवा त्यांच्या औषधांचा खर्च उचला. आपण अशी मदत जर केली तर कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत जाईल. अशा आशयाचे ट्विट सोनू सूदने केले आहे. सध्या सोशल मीडियावर सोनूचे हे ट्विट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.