श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे संजय दत्त मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल


मुंबई : श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात अभिनेता संजय दत्त याला दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यास काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. 61 वर्षीय संजय दत्त याची रुग्णालयात दाखल करताच कोविड-19 अँटीजेन टेस्ट करण्यात आली. जी निगेटिव्ह आली आहे. त्यांची स्वॅब टेस्टही घेण्यात आली आहे. ज्यातून त्यांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले की नाही हे कळणार आहे.

यासंदर्भातील वृत्त एबीपी न्यूजने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार लीलावती रुग्णालयाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. वी. रविशंकर यांनी सांगितले, की रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या संजय दत्त याची ऑक्सीजन लेवल कमी जास्त होत होती. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही. डॉ. रविशंकर पुढे म्हणाले, की संजय दत्तला सध्यातरी कोरोना वॉर्डमध्ये भरती करण्यात आलेले नाही. संजय दत्त हा सध्या डॉक्टरांच्या निगरानी खाली असून त्याच्या इतर काही चाचण्या करण्यात येणार आहेत.